

India T20I Squad for England Tour
esakal
India T20I Squad for England Tour: भारतीय संघाला जूनच्या शेवटी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. त्यासाठी टी-२० मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. आगामी दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळाला आहे. टी-२० संघातून अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले असून त्याच्या जागी आता युवा फलंदाज २३ वर्षीय तिलक वर्माची नवीन उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.