
India Cricket Team: गेल्या ६ महिन्यातील भारतीय संघाच्या कामगिरीने सातत्य न दिसल्याने आता बीसीसीआयने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंसाठी नवी नियमावलीही जाहीर झाली आहे. आता संजू सॅमसनही वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या भारतात विजय हजारे ट्रॉफी ही देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना निवड समिती लक्षात घेण्याची शक्यता आहे.
अशात या महत्त्वाच्या स्पर्धेत संजू सॅमसन खेळलेला नाही. त्यामुळे तो या स्पर्धेत का खेळला नाही, याची चौकशी बीसीसीआयकडून केली जाणार आहे.