IPL 2024 Playoffs: मुंबईपाठोपाठ पंजाबचंही आव्हान संपलं, आता प्लेऑफची शर्यत 8 संघात; जाणून घ्या समीकरण

IPL 2024 Playoffs Qualification: मुंबई इंडियन्सपाठोपाठ पंजाब किंग्सचेही आयपीएल 2024 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता प्लेऑफच्या शर्यतीत 8 संघ उरले आहेत.
Punjab Kings
Punjab Kings Sakal

IPL 2024 Playoffs Qualification: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गुरुवारी (9 मे) पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात सामना झाला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 60 धावांनी विजय मिळवला.

बेंगळुरूचा हा 12 सामन्यांमधील पाचवा विजय होता. मात्र, पंजाबला 12 सामन्यांमधील आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पंजाबच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशेला सुरुंग लागला आहे. त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपले आहे.

आयपीएल 2024 प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा पंजाब दुसरा संघ आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. मुंबईनेही 12 सामन्यांमधील 4 सामनेच जिंकले आहेत.

त्यामुळे मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांनी त्यांचे उर्वरित २ साखळी सामने जिंकले, तरी ते 12 पाँइंट्सपर्यंतच पोहचू शकतात. अन्य 8 संघांना 12 पेक्षा अधिक पाँइंट्स मिळवण्याची संधी असल्याने मुंबई आणि पंजाबचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Punjab Kings
T20 World Cup स्पर्धेसाठी संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

राजस्थान-कोलकातासाठी सर्वात सोपा मार्ग

सध्या आयपीएल 2024 स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 11 सामन्यांमधील 8 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 16 पाँइंट्स आहेत.

त्यामुळे जर या दोन्ही संघांनी आता केवळ एक सामना जरी जिंकला, तरी ते प्लेऑफमधील स्थान अधिकृतरित्या पक्कं करणार आहेत. त्यांनी आणखी एक विजय मिळवला, तर त्यांचे 18 पाँइंट्स होतील.

त्यांच्याव्यतिरिक्त 18 पाँइंट्सपर्यंत पोहचण्याची संधी केवळ सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या दोनच संघांना आहे. त्यामुळे 18 पाँइंट्स मिळवताच राजस्थान आणि कोलकाता प्लेऑफमधील स्थान निश्चित करू शकतात.

याशिवाय प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघही शर्यतीत आहेत.

Punjab Kings
PBKS vs RCB : विराटचा एक थ्रो अन् त्या 92 धावा... जय पराजयात फरक फक्त एवढाच!

दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. हैदराबादने 12 सामन्यांमधील 7 सामन्यांत विजय आणि 5 पराभव स्विकारले आहेत. त्यामुळे त्यांचे 14 पाँइंट्स आहेत. चेन्नईने 11 सामन्यांमधील 6 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यांचे 12 पाँइंट्स आहेत.

या दोन्ही संघांना थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरित सर्व साखळी सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र, जर एकही सामना पराभूत झाला, तर मात्र त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

दरम्यान, ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की जर हैदराबादने आणखी एक आणि चेन्नईने आणखी दोन विजय मिळवले, तर ते दोन्ही संघ 16 पाँइंट्सपर्यंत पोहचतील, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांचे आव्हान संपुष्टात येईल. कारण या दोन्ही संघांना 14 पाँइंट्सपर्यंतच पोहचण्याची संधी आहे.

Punjab Kings
Neeraj Chopra: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा, किशोर जेनाची दोहा डायमंड लीगमध्ये परीक्षा, कधी अन् कुठे पाहणार स्पर्धा?

दरम्यान, बेंगळुरू आणि गुजरात या दोन्ही संघांना प्लेऑफमधील स्थान मिळवण्यासाठी आपापले उर्वरित साखळी सामने तर जिंकावे लॉगतीलच, पण त्याचबरोबर अन्य संघांच्या निकालावरही त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

त्याचबरोबर या दोन्ही संघांनी आता एक जरी सामना पराभूत झाला, तर त्यांचे आव्हान संपणार आहे. बेंगळुरूचे 10 पाँइंट्स आहेत, तर गुजरातने 11 सामन्यांमधील 4 सामने जिंकले असल्याने त्यांचे 8 पाँइंट्स आहेत.

याबरोबरच लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनाही आपापले उर्वरित साखळी सामने जिंकले, तरी अन्य संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. लखनौ आणि दिल्ली या दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 सामन्यांमधील 6 सामने जिंकले आहेत, तर 6 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 12 पाँइंट्स आहेत. त्यांना 16 पाँइंट्सपर्यंतच पोहचण्याची संधी आहे.

अशात त्यांना सर्व सामने जिंकण्याबरोबरच बाकी संघ 16 पाँइंट्सपर्यंत पोहणार नाहीत किंवा पोहचले तरी त्यांचे नेट रन रेट कमी असेल, अशी अपेक्षा करावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com