IPL 2024: अ‍ॅक्शन तशी रिअ‍ॅक्शन! रुसोच्या गोळीबार सेलिब्रेशनला विराटकडून कडकडीत प्रत्युत्तर, Video व्हायरल

Virat Kohli - Rilee Rossouw Celebration: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स संघातील सामन्यादरम्यान रिली रुसोने केलेल्या सेलिब्रेशनला विराटने दिलेल्या प्रत्युत्तराने लक्ष वेधले होते.
Virat Kohli - Rilee Rossouw Celebration
Virat Kohli - Rilee Rossouw CelebrationSakal

Virat Kohli - Rilee Rossouw Celebration: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत गुरुवारी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात धरमशाला येथे सामना पार पडला. या सामन्यात बेंगळुरूने 60 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

दरम्यान, या सामन्यात विराट कोहली चांगलाच चर्चेत राहिला. तसेच त्याचा आणि पंजाब किंग्सचा फलंदाज रिली रुसोचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

झाले असे की या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर बेंगळुरूने 242 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रिली रुसोने तुफानी फटकेबाजी केली.

Virat Kohli - Rilee Rossouw Celebration
IPL 2024 Playoffs: मुंबईपाठोपाठ पंजाबचंही आव्हान संपलं, आता प्लेऑफची शर्यत 8 संघात; जाणून घ्या समीकरण

त्याच्या फटकेबाजीमुळे 9 षटकांच्या आतच पंजाबने 100 धावांचा टप्पा पार केला होता. त्याने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. अर्धशतक केल्यानंतर रुसोने गुडघ्यावर बसून बॅटने गोळीबार करण्याची कृती करत सेलिब्रेशन केले होते.

दरम्यान, त्याला 9 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्ण शर्माने बाद केले, त्याचा झेल विल जॅक्सने घेतला. त्यामुळे रुसोला 27 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह ६१ धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर मात्र विराटनेही त्याच्या गोळीबारच्या सेलिब्रेशनचे प्रत्युत्तर दिले. त्यानेही हाताने गोळीबार करण्याची कृती केली. या घटनेचे व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या दोन्ही खेळाडूंमधील ही चकमक गमतीने झाली. ते दोघेही सामन्यानंतर एकमेकांना भेटलेही होते.

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 241 धावा केल्या होत्या. बेंगळुरूकडून विराटने 47 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 92 धावांची खेळी केली. तसेच रजत पाटिदारने 23 चेंडूत 55 धावांची खेळी केली, तर कॅमेरॉन ग्रीनने 46 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला 17 षटकात सर्वबाद 181 धावाच करता आल्या. पंजाबची फलंदाजी रुसो बाद झाल्यानंतर कोलमडली. त्याच्याव्यतिरिक्त केवळ शशांक सिंगलाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने 37 धावांची खेळी केली. बेंगळुरूकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com