
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत इंग्लंडने त्यांच्या पहिल्याच सामन्यात इतिहास घडवला आहे. शनिवारी लाहोरला होत असलेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० षटकात ८ बाद ३५१ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर ३५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील ३५१ धावा ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी अमेरिकेविरुद्ध २००४ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ बाद ३४७ धावा केल्या होत्या. तसेच पाकिस्तानने भारताविरुद्ध २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ बाद ३३८ धावा केल्या होत्या.