Bhuvneshwar Kumar: टी२० मध्ये तर कमबॅक झालं, आता भूवीची वर्ल्ड कप २०२७ च्या मिशनमध्येही होणार एन्ट्री?

Is 2027 World Cup Road Map Open for Bhuvneshwar Kumar? : भुवनेश्वर कुमारचे भारताच्या टी२० संघात ४ वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. यानंतर आता तो २०२६ च्या वर्ल्ड कपसाठीही दावेदारी ठोकणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Bhuvneshwar Kumar

Bhuvneshwar Kumar

Sakal

Updated on: 

Bhuvneshwar Kumar T20I Recall: भारतीय संघ ऑक्टोबरच्या अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात ५ टी२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे. यातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून ३६ वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्येच भुवनेश्वर भारतासाठी अखेरचा टी२० सामना खेळला होता. पण त्यानंतर ४ वर्षे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण २०२५ आणि २०२६ आयपीएल हंगामात त्याने केलेल्या कामगिरीने त्याचा विचार करण्यास निवड समितीला पुन्हा प्रवृत्त केले आणि अखेर न्यूझीलंडमधील वातावरण पाहाता त्याची भारतीय संघात निवड झाली.

Bhuvneshwar Kumar
India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com