LSG PAY ₹8.6 CRORE FOR JOSH INGLIS DESPITE LIMITED AVAILABILITY
esakal
Cameron Green vs Josh Inglis IPL auction per match comparison: इंडियन प्रीमियर लीग २०२६ साठी झालेल्या मिनी लिलावात ७७ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मिळून २१५ हून अधिक कोटी खर्च केले. कोलकाता नाइट रायडर्सने २५.२० कोटींत कॅमेरून ग्रीनला, तर १८ कोटींत मथीशा पथिराणाला आपल्या ताफ्यात घेऊन सर्वात मोठी डील केली. तेच लखनौ सुपरजायंट्स संघाने २२.९५ कोटी रक्कमेसह प्रवेश केला आणि ४ परदेशी खेळाडूंसह सहा जणांना करारबद्ध केले. पण, त्यांची एक बोली ही मोठी चूक असल्याची चर्चा रंगली आहे.