आता, हेच बाकी होतं! BGT पराभवानंतर टीम इंडियाला ICC ने दिला दणका, ८ वर्षानंतर असं झालं की...

India Loses No. 2 Spot in ICC Test Rankings: भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-० अशा आघाडीनंतरही ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-१ असे पराभूत केले.
Rohit Sharma
Rohit Sharmaesakal
Updated on

Indian cricket team ranking in latest ICC Test standings : भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे भारताचे स्वप्नही धुळीस मिळाले. त्यात आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाची आयसीसीच्या ताज्या कसोटी संघ क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारताने २०१९-२१ आणि २०२१-२३ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती, परंतु यंदा ते अपयशी ठरले आणि त्यांचे ताज्या क्रमवारीत १०९ रेटिंग गुण आहेत. २०२३ चा WTC विजेता ऑस्ट्रेलिया १२६ रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका ११२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने कालच घरच्या मैदानावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा व्हाईटवॉश दिला. याचा फटका भारताला क्रमवारीत बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com