Ruturaj Gaikwad Tipped For Major Test Role
esakal
भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स
Domestic cricket performance stats of Ruturaj Gaikwad in red-ball format : भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये गटांगळ्या खातोय. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश पत्करावा लागला. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने ४०८ धावांनी विजय मिळवला आणि हा भारताचा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. यासह आफ्रिकेने ही मालिका २-० अशी जिंकली आणि नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखालील भारताचा हा घरच्या मैदानावरील दुसरा व्हाईटवॉश ठऱला. भारताचा कसोटी संघ सध्या खराब फॉर्मातून जातोय आणि या संघात सातत्याने होत असलेले बदल त्याला कारणीभूत असल्याचे म्हटले जातेय. पण, आता हातातून वेळ निसटली आहे आणि कसोटी संघ मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात देशांतर्गत स्पर्धा गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.
