

RUTURAJ GAIKWAD AND SANJU SAMSON TO OPEN FOR CSK, BIG SURPRISE FOR FANS.jpg
esakal
Ruturaj Gaikwad, Sanju Samson Set to Open for CSK: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पूर्वी चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) येण्याने CSK च्या ताफ्यात उत्साहाचे वातावरण होतेच, त्यात सलामीला कोण खेळेल, हा पेचही उभा राहिला होता. पण, CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने तो पेच सोडवला आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ऋतुराज आणि संजू ही जोडी IPL 2026 मध्ये सलामीला खेळताना दिसणार आहे. ऋतुराजने तशी घोषणा केली आहे, त्यामुळे आयुष म्हात्रेला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागेल.