Jos Buttler Resigns as England Captain : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघात मोठी उलथापालथ झाली आहे. इंग्लंडच्या व्हाईट-बॉल संघाचा कर्णधार जॉस बटलरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही बातमी इंग्लंड क्रिकेट संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे. बटलरच्या नेतृत्वाखाली संघाने काही मोठ्या विजयांची नोंद केली होती, पण चॅम्पियन्स ट्रॉफीतील सध्याच्या स्थितीमुळे त्याने पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आता कोणाच्या हाती जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.