Pakistan Cricket Team
esakal
Pakistan vs UAE toss and start time Dubai Cricket Stadium : आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला नेमकं काय करावं हेच समजत नाहीए... त्यांना त्यांच्या शब्दावर ठाम राहावे लागल्यास कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागेल अन् आता खेळले, तर जगासमोर राहिलेली लाजही जाईल. भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न केल्याने ते रुसले आहेत. त्या रागात त्यांनी सामनाधिकारी Andy Pycroft यांच्या निलंबनाची मागणी केली. इथवर थांबतील ते पाकिस्तानी कुठे, त्यांनी तर आयसीसीने मागणी मान्य केली नाही, तर UAE विरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. आता ते पेचात अडकले.