Yashasvi Jaiswal and Shardul Thakur return as Mumbai squad
esakal
Shardul Thakur leads Mumbai in Ranji Trophy quarterfinal : भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान न मिळालेल्या यशस्वी जैस्वालचे ( Yashasvi Jaiswal ) मुंबईच्या रणजी करंडक स्पर्धेतील संघात पुनरागमन झाले आहे. यशस्वीने मागील सामन्यात न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तो उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबईच्या संघात परतला आहे. दुखापतीतून सावरत शार्दूल ठाकूरही परतला असून तो कर्नाटकविरुद्धच्या लढतीत नेतृत्व करणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( MCA ) सोमवारी १६ सदस्यीय संघ जाहीर केला.