

Cameron Bancroft Breaks Silence on Sandpapergate
Sakal
Cameron Bancroft Breaks Silence on Ball Tampering: ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वाला ढवळून काढलेल्या चेंडू छेडछाड प्रकरण पुन्हा चर्चेत आहे. २०२८ मध्ये केपटाऊनला झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट सँडपेपर लपवताना सापडला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून सँडपेपरचा वापर करून चेंडूशी छेडछाड झाल्याचं समोर आले होते.
त्यानंतर तत्कालिन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना आपापली पदं गमवावी लागली होती. तसेच बॅनक्रॉफ्ट, स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर बंदीची कारवाईही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून झाली होती. एक वर्षाने स्मिथ आणि वॉर्नर यांनी पुनरागमनही केले. तथापि, या घटनेला आता ८ वर्षे होऊन गेले आहेत.
अशातच उस्मान ख्वाजाने त्याच्या 'सब्र' पुस्तकात याचा उल्लेख केल्याने पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेबद्दल संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला माहित असल्याचे त्याने दावा केला, ज्याला वॉर्नरने पाठिंबा दिला. पण मिचेल स्टार्क, सध्याचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. यानंतर बॅनक्रॉफ्टच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर त्याने या प्रकरणावर मौन सोडले असून संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला चेंडू छेडछाड कटाची माहिती असल्याचे सांगितले.