

Cameron Green angry on Usman Tariq Bowling Action
Sakal
Cameron Green angry on Pakistan's Usman Tariq Bowling Action: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत आहेत. या मालिकेतील दुसरा सामना लाहोरला शनिवारी (३१ जानेवारी) पार पडला, ज्यात पाकिस्तानने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेतही २-० फरकाने विजयी आघाडी घेतली.
या सामन्यात जरी पाकिस्तानने विजय मिळवला असला, तरी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने विकेटनंतर (Cameron Green Wicket) दिलेल्या कृतीची बरीच चर्चा झाली.