Cameron Green Falls for a Duck in Ashes 3rd Test
esakal
Australia vs England Ashes 3rd Test Cameron Green: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याच्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सने खिशातील २५.२० कोटी खर्च केले. आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल त्याला आयपीएलमध्ये बम्पर डील मिळाली आणि आज तो भोपळ्यावर बाद झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातली अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी आजपासून सुरू झाली.