CSK and KKR go aggressive in R Ashwin’s IPL 2026 mock auction
esakal
IPL 2026 auction strategy CSK and KKR: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी येत्या १६ डिसेंबरला अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे मिनी लिलाव होणार आहे. यावर्षी लिलावासाठी नोंदवलेल्या १३५५ खेळाडूंपैकी एकूण ३५९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण, यातूनही ७७ खेळाडूंवरच यशस्वी बोली लागणार आहे. या मिनी लिलावापूर्वी, माजी भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक मॉक लिलाव आयोजित केला होता. चाहत्यांनी सर्व १० आयपीएल संघांसाठी बोली लावली होती, ज्यामध्ये कॅमेरून ग्रीन ( Cameron Green ) हा सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू होता.