Ranji Trophy : २६ चेंडूंत १०४ धावा! रजत पाटीदारचे वादळी द्विशतक, संघाला मिळवून दिली २५०+ धावांची आघाडी

Rajat Patidar double century Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मध्यप्रदेशचा नवा कर्णधार रजत पाटीदार याने ऐतिहासिक खेळी करत धडाकेबाज द्विशतक ठोकलं. त्याने पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः धुळ चारली. या झंझावाती खेळीत त्याने चौफेर फटकेबाजी केली.
Rajat Patidar smashed a maiden First-Class double century in Ranji Trophy 2025

Rajat Patidar smashed a maiden First-Class double century in Ranji Trophy 2025

esakal

Updated on

Rajat Patidar smashed a maiden First-Class double century: इंडियन प्रीमिअर लीग आणि इराणी चषक स्पर्धा विजेता कर्णधार रजत पाटीदार याने रणजी करंडक स्पर्धेत द्विशतकी खेळी केली. रजतने सातत्य दाखवताना पंजाबच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. मध्य प्रदेशचा कर्णधार म्हणून खेळताना रजतने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे पहिले द्विशतक साजरे केले. त्याने या खेळीत २६ चौकार लगावताना मध्य प्रदेशला पहिल्या डावात आतापर्यंत २७६ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. पंजाबच्या पहिल्या डावातील २३२ धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने १४६ षटकांत ८ बाद ५१९ धावा केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com