
भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली आहे. तेंडुलकर - अँडरसन ट्रॉफी या कसोटी मालिकेतील हेडिंग्लेला झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्यासोबतच मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात इंग्लंडने भारताने दिलेले ३७१ धावांचे मोठे लक्ष्य पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ८२ षटकात पूर्ण करत विजय मिळवला. या सामन्यात भारताने पहिल्या डाव ४७१ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पहिल्या डावात ४६४ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला ६ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात भारताने ३६४ धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी लक्ष्य ठेवलं होतं. पण इंग्लंडने शेवटच्या डावात सरस खेळ केला.