
इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेला अत्यंत रोमांचक सुरूवात झाली आहे. लीड्समधील हेडिंग्लेमध्ये झालेला पहिला सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत रंगला. शेवटच्या सत्रापर्यंत दोन्ही संघात चुरस पाहायला मिळाली. पण अखेर इंग्लंडने पहिल्या कसोटीत ५ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवत भारताविरुद्ध मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
याशिवाय इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली आहे. भारताला मात्र शेवटच्या सत्रात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडसाठी बेन डकेटची फलंदाजी महत्त्वाची ठरली.
या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर चौथ्या डावात ४७१ धावांचे विजयासाठी लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग इंग्लंडने शेवटच्या सत्रात ८२ षटकात ५ विकेट्स गमावत ३७३ धावा करून पूर्ण केला. डकेटशिवाय क्रावली आणि जो रुट यांनी दुसऱ्या डावात अर्धशतके केली.