
Champions Trophy 2004, England vs West Indies: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाचे हे चॅम्पियन्स ट्रॉफीचे नववे पर्व असून नेहमीच या स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. प्रत्येक पर्वातील अंतिम सामनाही चर्चेचा विषय ठरला आहे. २००४ सालची चॅम्पियन्स ट्रॉफीही याला अपवाद नव्हती.
तोंडाजवळ असलेला विजयाचा घास हिसकावणं म्हणजे काय हे २००४ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने अनुभवलं होतं. वेस्ट इंडिजच्या तळातल्या फलंदाजांनी अक्षरश: इंग्लंडकडून विजय खेचून आणला होता.
वेस्ट इंडिज जरी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकले नसले, तरी त्यांनी २००४ साली मिळवलेलं विजेतेपद त्यांच्या संघाला मोठी प्रेरणा देणारे ठरले होते. त्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलेलं, ते जाणून घेऊया.