
Champions Trophy 2025 Format: नववी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या १९ फेब्रुवारी सुरु होणार असून वनडेतील सर्वोत्तम आठ संघ एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज आहेत. विशेष म्हणजे तब्बल ८ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे पुनरागमन होत असल्याने क्रिकेट वर्तुळात उत्साह दिसून येत आहे.
यापूर्वी २०१७ साली ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती. पण आयसीसीने ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.