
भारतीय क्रिकेट संघाने जून २०२४ च्या अखेरीस टी२० वर्ल्ड कप स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकली. या विजेतेपदानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता हे तिघेही २० फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळताना दिसणार आहेत.
यादरम्यान त्यांच्या भविष्याबद्दलही बरीच चर्चा होताना दिसत आहे. या स्पर्धेनंतर हे तिघे वनडेमधून निवृत्त होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात माजी भारतीय क्रिकेटपटूने ही या तिन्ही खेळाडूंचीही शेवटची आयसीसी स्पर्धा ठरू शकते, असं म्हटलंय.