ICC Champions Trophy 2025 : आयसीसीची सुरक्षा टीम, क्युरेटर पोहचले पाकिस्तानात; भारतीय संघही जाणार?

ICC Champions Trophy 2025
ICC Champions Trophy 2025esakal

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्टेडियम फायनल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडीला होण्याची शक्यता आहे. आयसीसीची सुरक्षा टीम आणि पिच क्युरेटर हे पाकिस्तानमध्ये पोहचले असून ते हे तीन स्टेडियम 8 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी योग्य आहेत का याची पाहणी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात आयसीसी सुरक्षा टीम आणि क्युरेटर, अँडी अॅटकिन्सन पाकिस्तानात दाखळ झाले होते.

ICC Champions Trophy 2025
PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

चॅम्पियन्स ट्रॉफीसाटी तीन स्टेडियमचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जर भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला तर भारतीय संघ लाहोरमध्ये आपले सर्व सामने खेळू शकते. याचा अर्थ भारत - पाकिस्तान सामना हा गद्दाफी स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

अॅटकिन्सन हे आयसीसीसाठी बऱ्याच काळापासून काम करत आहेत. त्यांनी गेल्यावर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपवेळी देखील आयसीसीची मदत केली होती. आयसीसीने अजून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोणत्याही बाबतीत ग्रीन सिग्नल दिलेला नाही.

ICC Champions Trophy 2025
PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

भारतीय संघ 16 वर्षांनी पाकिस्तानात जाणार?

पाकिस्तानमध्ये 1996 नंतर पहिल्यांदाच एखादी आयसीसी स्पर्धा होत आहे. 1996 ला पाकिस्तानमध्ये वनडे वर्ल्डकप झाला होता. पाकिस्तान आता आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. मात्र आता त्यांना आयसीसीच्या बोर्ड मिटिंगची वाट पाहावी लागणार आहे. ही बैठक श्रीलंकेत जुलै महिन्यात होणार आहेत.

सध्या तरी बीसीसीआय ही जरी आयसीसीने पाकिस्तानला स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी दिली तरी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार नाहीये. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

त्यांनी 2012-13 पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. पाकिस्तानने 2012 - 13 ला भारताचा दौरा केला होता. भारतीय संघाने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com