PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

PCB T20 WC 24 Head Coach
PCB T20 WC 24 Head Coachesakal

PCB T20 WC 24 Head Coach : पीसीबीने आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाचा कोच म्हणून गॅरी कर्स्टनची नियुक्ती केली आहे. तर जेसन गिलेस्पीला कसोटी संघाचा कोच केलं आहे. टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यास काही आठवडेच शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचा माजी विकेटकिपर राशिद लतीफनं देखील पीसीबीच्या या निर्णयावर खरमरीत टीका केले आहे.

PCB T20 WC 24 Head Coach
MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

राशिद लतीफ म्हणाला की, 'गॅरी कर्स्टनने हे भारताचे आणि आयपीएलमध्ये देखील फ्रेंचायजीसाठी यशस्वीरित्या कोचिंग केलं आहे. मात्र त्यांची नियुक्ती पीसीबीनं चुकीच्या वेळी केली. पाकिस्तान बाबतीत वेळ ही कायम डोकेदुखी असते. हा निर्णय का घेतला याचं कोडं मलाही उलगडलेलं नाही. पुढच्या महिन्यात वर्ल्डकप आहे. जर तो आपण हारलो तर पीसीबी कर्स्टन किंवा बाबर आझमला याचा दोषी ठरवणार.'

लतीफ पुढे म्हणाला की, 'पाकिस्तान क्रिकेट टीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही आयसीसी स्पर्धेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पाकिस्तान मोठे सामने जिंकण्याची क्षमता ठेवते. कर्स्टन आणि गिलेस्पी हे दोघे अनुभवी कोच आहेत. त्यांचे रेकॉर्ड देखील चांगले आहे. मात्र त्यांची नियुक्ती आधीच व्हायला हवी होती.'

PCB T20 WC 24 Head Coach
MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

'जर मला आधीच माहिती असेल की संघाचा हेड कोच, कॅप्टन आणि निवडसमिती कोण आहे तर गोष्टी सोप्या होतात. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड यांच्या बाबतीत हे स्पष्ट आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचे 12 - 13 खेळाडू कोणते आहेत. कोच कोण आहे. तुम्हाला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 6 - 8 महिने आधी याबाबत स्पष्टता आली पाहिजे.'

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com