
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला ४४ धावांनी पराभूत केलं. या पराभवासह भारताने अ गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे. रविवारी दुबईत झालेल्या या सामन्यानंतर सेमीफायनलचे चित्रही स्पष्ट झाले आहे.
या सामन्याच्या आधीच सेमीफायनलमधील चार संघ निश्चित झाले होते, परंतु कोणता संघ कोणाविरुद्ध खेळणार, हे स्पष्ट होत झाले नव्हते. पण आता भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर सेमीफायनलचं वेळापत्रक समोर आलं आहे.