
Champions Trophy 2025 Semifinal Equation: अंतिम साखळी सामन्यात इंग्लंडचा डाव दक्षिण आफ्रिकेने १७९ धावांवर गुंडाळला अन् चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारत व न्यूझीलंड संघांनी 'अ' गटातून आधीच उपांत्य फेरी गाठली होती. तर काल ऑस्ट्रेलिया संघ व आज दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे आता भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका अन् ऑस्ट्रेलिया हे चार संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी सामना खेळतील. पण भारतीय संघ कोणत्या संघाविरूद्ध सेमीफायनलचा सामना खेळेल हे सविस्तर जाणून घ्या.