Chennai Super Kings eliminated from IPL 2026 playoffs
esakal
Chennai Super Kings eliminated from IPL 2026 playoffs : चेन्नई सुपर किंग्सचा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. गुजरात टायटन्सने नरेंद्र मोदी स्टेडियमवर दणदणीत विजय मिळवून CSK ला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले. चेन्नईने १२ गुणांसह स्पर्धेचा निरोप घेतला, तर GT १८ गुणांसह Qualifier 1 च्या शर्यतीत आले आहेत. प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी अजूनही राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स हे चार संघ शर्यतीत आहेत. त्यामुळे कसे असेल हे समीकरण, ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.