46 Fours, 7 Sixes अन् नाबाद ४०० धावा! Ranji Trophy मध्ये चिन्मय सुतारचा पराक्रम; ७७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

Chinmay Sutar Hits Unbeaten 400 Runs in Ranji Trophy : रणजी ट्रॉफीमध्ये चिन्मय सुतारने ४०० धावांची खेळी करत ऐतिहासिक पराक्रम केला. त्याने ७७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
Chinmay Sutar Hits Unbeaten 400 Runs in Ranji Trophy | Mizoram vs Nagaland

Chinmay Sutar Hits Unbeaten 400 Runs in Ranji Trophy | Mizoram vs Nagaland

Sakal

Updated on: 

Chinmay Sutar Scores 400 in Ranji Match: रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेत मुंबईचा फलंदाज चिन्मय सुतार याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने प्लेट विभागात मिझोरामकडून खेळताना नागालँडविरुद्ध ४०० धावांनी नाबाद खेळी करत विक्रमी कामगिरी केली. तो याच हंगामापूर्वी मुंबईतून मिझोरोम संघात आला आहे.

दुसऱ्या फेरीत मिझोराम आणि नागालँड (Mizoram vs Nagaland) यांच्यात दिमापूर येथे रविवारपासून (१८ ऑक्टोबर) सामना सुरू आहे. या सामन्यात मिझोराम प्रथम फलंदाजी करत होते. त्यांनी पहिल्याच दिवशी पहिल्या डावात ५ बाद ३३१ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाखेर चिन्मय १८० धावांवर नाबाद होता. त्याला खियांगटे व्हॅनरोटलिंगा साथ देत होता. पण तो फार काळ टिकला नाही.

Chinmay Sutar Hits Unbeaten 400 Runs in Ranji Trophy | Mizoram vs Nagaland
RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com