
रविवारी (९ मार्च) भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात जिंकली. दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले.
भारतीय संघ तीन वेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता होणारा पहिलाच संघही ठरला आहे. त्यामुळे या विजेतेपदानंतर भारतीय संघाने जोरदार आनंद साजराही केला. यावेळी गंभीरनेही विजयाचा आनंद साजरा केला.