

Vaibhav Sooryavanshi
Sakal
India vs Ireland T20I Matches: भारतीय टी२० संघाला जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर टी२० मालिका खेळण्यासाठी जायचे आहे. पण या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच या मालिकेवर सुरक्षेचे सावट होते. याबाबत आता क्रिकेट आयर्लंडनेच स्पष्टीकरण दिले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी आयर्लंडमधील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या बेलफास्टमध्ये नागरी अशांतता होती. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता क्रिकेट आयर्लंडने नॉर्दर्न आयर्लंड पोलीस सेवेशी (PSNI) संपर्क साधला होता.