
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड गेल्या वर्षभरापासून भारतीय संघातून दूर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण धावा केल्यानंतरही त्याला भारताच्या संघात पुनरागमन करण्यात अपयश आलं आहे. तो सध्या भारत अ संघासोबत इंग्लंडला गेलेला आहे, मात्र पहिल्या दोन्ही प्रथम श्रेणी सामन्यांसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. ॉ
तसेच सध्या भारताचा कसोटी संघही सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्यांना २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण ऋतुराजचा या मालिकेसाठीही विचार करण्यात आलेला नव्हता. पण असं असलं तरी आता तो इंग्लंडमध्ये खेळताना दिसणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.