
India’s T20 Squad for England Series: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची शनिवारी (११ जानेवारी) निवड करण्यात आली आहे. सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मोहम्मद शमीचे वर्षभरानंतर पुनरागमन झाले आहे. पण या संघनिवडीनंतर काही प्रश्नही विचारण्यात येत आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतणाऱ्या संघातील वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि ध्रुव जुरेल यांनाही या टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे, तर इतरांना विश्रांती देण्यात आली आहे.