
मुंबई ही अनेकांसाठी स्वप्ननगरी असते, त्यामुळे तिथे घर घेणं ही मोठी गोष्ट समजली जाते. मुंबईत अनेक मोठ्या क्रिकेटपटूंचीही घरं असून ते तिथं राहतात देखील. यात रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
आता आणखी एका मुंबईकर खेळाडूनेच आलिशान घर खरेदी केले आहे. हा खेळाडू म्हणून अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे. शिवम मुंबईतच लहानाचा मोठा झाला असून देशांतर्गत क्रिकेट देखील मुंबईकडून खेळतो. आता त्याने मुंबईतील अंधेरीत दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत.