
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीचे सर्व ७० सामने संपले. अंतिम ४ संघही मिळाले. पण या हंगामादरम्यान सर्वाधिक निराश असतील ते चेन्नई सुपर किंग्सचे चाहते. पाचवेळच्या विजेत्या चेन्नईला यंदाच्या हंगामात अनेक मानहानिकारक पराभवांना सामोरे जावे लागले.
१६ पैकी १२ वेळा प्लेऑफ खेळणाऱ्या चेन्नई संघाच्या चाहत्यांनी संघाची इतकी खराब कामगिरी आजपर्यंत पाहिली नव्हती. त्यांनी नेहमीच चेन्नईला वर्चस्व गाजवताना पाहिले. मात्र यावेळी चेन्नईला १४ सामन्यांमध्ये फक्त ४ सामने जिंकता आले. ते घरच्या मैदानात चेपॉकवर पहिल्यांदाच सलग ५ सामने पराभूत झाले.
इतकेच नाही, तर एकाच हंगामात त्यांनी पहिल्यांदाच सलग ५ सामनेही पराभूत झाले. एकूणच हा हंगाम चेन्नईसाठी विसरण्यासारखा राहिला. ते आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिले आहेत.