

RR vs MI | IPL 2026
Sakal
RR vs MI Marathi News: शानदार सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात निष्प्रभ खेळामुळे ब्रेक लागलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज (७ एप्रिल) आयपीएल स्पर्धेत फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होत आहे. राजस्थानने मात्र त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकलेले आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) तंदुरुस्त होऊन संघात परतेल अशी आशा करत आहे. रविवारच्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता, परंतु आजच्या सामन्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यावर हार्दिकने सराव केला. हार्दिकच्या अनुपस्थितीमध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईला सहा विकेटने हार स्वीकारावी लागली होती.