

Ramakrishna Ghosh
esakal
Why Ramakrishna Ghosh is working in Indian Railways: आयपीएलमध्ये(IPL) खेळणारे क्रिकेटपटू म्हणजे कायम मैदानावरच दिसतात, अशी चाहत्यांची समज असते. मात्र, चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) मराठमोळा वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोष सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
आयपीएलमधील दुखापतीनंतर तो पुणे रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीस (टीसी) म्हणून ड्युटी बजावताना दिसला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्याच्या साधेपणाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक होत आहे.