

RR vs CSK | IPL 2026
Sakal
RR vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात गुवाहाटीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा संघ सुरुवातीलाच संकटात सापडला आहे.
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी गुवाहाटीत पाऊस पडलेला होता. त्यामुळे तेथील वातावरण ढगाळ असून त्याचा फायदा राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला आहे.