CSK vs SRH Live: महेंद्रसिंग धोनी 'चेपॉक' वर आला, पण खेळणार का? कॅप्टन ऋतुराजने उत्तर दिले... रवी शास्त्रींनी MS म्हणताच जल्लोष अन्...

MS Dhoni Arrives at Chepauk CSK vs SRH : महेंद्रसिंग धोनी आणि चेपॉक... हे नातं क्रिकेट चाहत्यांसाठी केवळ भावना नाही, तर एक उत्सव आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दुखापतीमुळे एकही सामना न खेळलेला धोनी सोमवारी प्रथमच सामन्याच्या दिवशी संघासोबत स्टेडियमवर पोहोचला आणि चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
MS Dhoni, is travelling to stadium

MS Dhoni, is travelling to stadium

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Marathi Update: महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमिअर लीगमधील शेवटचा सामना चेपॉकवर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो आता ४४ वर्षांचा आहे आणि IPL 2026 मध्ये दुखापतीमुळे तो आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. त्यात चेन्नई सुपर किंग्स या पर्वातील त्यांचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना सोमवारी खेळतोय... या सामन्यासाठी MS Dhoni चेपॉकवर दाखल झाल्याने सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com