

Daren Sammy
Sakal
Daren Sammy Warns India ahead of WI Clash: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा करो वा मरोचा सामना आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल, तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
त्यामुळे एकप्रकारे हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्यपूर्व सामनाच आहे. असे असतानाही वेस्ट इंडिजचा प्रमुख प्रशिक्षक डॅरेन सॅमीने (Darren Sammy) आपल्या संघावर विश्वास दाखवताना भारतीय संघाला (Team India) चेतावणीही दिली आहे. त्याने २०१६ टी२० वर्ल्ड कपचीही आठवण करून दिली आहे.