'डॅरिल मिचेल म्हणाला परत पाकिस्तानला कधीच येणार नाही, टॉम करन तर रडायला लागला', PSL खेळणाऱ्या खेळाडूंची कशी होती स्थिती?

Rishad Hossain Opens Up About PSL Chaos in Pakistan: भारत - पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग देखील स्थगित झाली असून परदेशी खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. पण परत घरी जाताना खेळाडू घाबरले होते.
Daryll Mitchell - Tom Curran
Daryll Mitchell - Tom CurranSakal
Updated on

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात सध्या तणावाचे वातावरण आहे.एप्रिलमध्ये जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने ऑपरेश सिंदूर मार्फत दिले. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले झाले. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रालाही बसला.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) एका आठवड्यासाठी स्थगित झाली, तर पाकिस्तान सुपर लीग (PSL) देखील स्थगित झाली. पाकिस्तान सुपर लीग युएईमध्ये हलवण्याचाही विचार होता. मात्र, त्यांना यासाठी नकार मिळाला. अखेर ही स्पर्धाही स्थगित करण्यात आली.

Daryll Mitchell - Tom Curran
PSL 2025 : काय हे पाकिस्तानी...! विकेट घेतल्यावर उत्साहात स्वतःच्याच खेळाडूच्या डोक्यावर मारलं; नेमकं काय घडलं? पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com