

David Warner Supports Usman Khawaja's Claims on 2018 Ball Tampering Saga
Sakal
David Warner Backs Usman Khawaja Claims on 2018 Australian Ball Tampering Saga: आठ वर्षांपूर्वी एका धक्कादायक घटनेनं ऑस्ट्रेलियन क्रिकेट ढवळून निघालं होतं, ही घटना होती केपटाऊनमध्ये झालेलं चेंडू छेडछाड प्रकरण. खरंतर या घटनेनंतर नुकतेच ८ वर्षांनी ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळला, ज्यात दक्षिण आफ्रिकेने २-१ असा विजय मिळवला.
चेंडू छेडछाडीच्या प्रकरणानंतर ८ वर्षांनी झालेल्या या मालिकेकडे सर्वांचेच लक्ष होते. याचदरम्यान आता या वादग्रस्त प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजाने २०१८ च्या चेंडू छेडछाड प्रकरणात संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ सहभागी होता, असा खळबळजनक दावा केला आहे, ज्याला आता त्याच्या माजी संघसहकारी डेव्हिड वॉर्नरने पाठिंबा दिला असून एक व्हिडिओही शेअर केला आहे.