SA vs AUS, 3rd Test: रबाडाचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् द. आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका; मालिका जिंकून WTC Points Table मध्येही केला उलटफेर

South Africa beat Australia in Test Series Decider: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीत पराभूत करत मालिका जिंकली आहे. या सामन्यात कागिसो रबाडाने विश्वविक्रमही केला. याशिवाया या विजयाचा दक्षिण आफ्रिकेला WTC पाँइंट्स टेबलमध्येही फायदा झाला आहे.
South Africa beat Australia in Test Series | WTC 2027 Points Table

South Africa beat Australia in Test Series | WTC 2027 Points Table

Sakal

Updated on: 

South Africa beat Australia in 3rd Test: दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केपटाऊनला झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात १७६ धावांनी पराभूत केले. अखेरच्या दिवशी मिळवलेल्या या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात पाचव्या दिवशी विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर २८८ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने ठेवले होते. पण ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ५७.१ षटकात सर्वबाद १११ धावाच करता आल्या.

दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) सुरुवातीला मोठ्या विकेट्स घेतल्यानंतर सिमॉन हार्मरने (Simon Harmer) कमालीची गोलंदाजी करत ६ विकेट्ससह ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. दरम्यान, रबाडाने दुसऱ्या डावात घेतलेल्या तीन विकेट्समुळे त्याने विश्वविक्रमालाही (World Record) गवसणी घातली.

South Africa beat Australia in Test Series | WTC 2027 Points Table
SA vs AUS 2nd Test: छोटी हाईट, सॉलिड फाईट! टेम्बा बवुमा ऑसी गोलंदाजांना कोळून प्यायला... सोबतीला मार्को यान्सेन उभा राहिला
Loading content, please wait...