

KL Rahul - Abhishek Porel | PBKS vs RCB | IPL 2026
Sakal
IPL 2026, DC vs RR Marathi News: रविवारी (१७ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानातील अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध विकेट्सने ५ दणदणीत विजय मिळवला. या सामन्यातील विजयामुळे दिल्लीने स्पर्धेतील आव्हान कायम राखले असून आता प्लेऑफसाठीची शर्यतही आणखी चुरशीची बनली आहे. दिल्लीसाठी मिचेल मार्शच्या तिखट माऱ्यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेलने अर्धशतकं ठोकत मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात दिल्लीसमोर राजस्थानने १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य दिल्लीने १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत १९७ धावा करत पूर्ण केले. दिल्लीचा हा १३ सामन्यांतील ६ वा विजय आहे. त्यामुळे त्यांचे १२ गुण झाले आहेत. तसेच राजस्थानचा मात्र १२ सामन्यांतील हा ६ वा पराभव होता. तसेच सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे त्यांचे १२ गुण आहेत.