Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL 2026 मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Virat Kohli IPL Records: आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सविरुद्ध २३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक करताना इतिहास घडवला आहे.
Virat Kohli | PBKS vs RCB | IPL 2026

Virat Kohli | PBKS vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दमदार फॉर्ममध्ये परतला आहे. गेल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शतक केल्यानंतर आता रविवारी (१७ मे) पंजाब किंग्सविरुद्ध दमदार अर्धशतक करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

रविवारी झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २३ धावांनी विजय मिळवत आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli | PBKS vs RCB | IPL 2026</p></div>
Virat Kohli: गरज नसेल तर स्वतःहून बाजूला होतो! विराटचे धक्कादायक विधान, वारंवार सिद्ध करायला लावणे अयोग्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com