WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Delhi Capitals secure their spot in the WPL 2026 Eliminator: वूमन्स प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. या विजयामुळे मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले आहे.
Delhi Capitals

Delhi Capitals

Sakal

Updated on

Delhi Capitals secure their spot in the WPL 2026 Eliminator: वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (WPL 2026) प्लेऑफचे चित्र रविवारी (१ फेब्रुवारी) स्पष्ट झाले आहे. रविवारी जेमिमाह रोड्रिग्सच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सविरुद्ध अखेरच्या साखळी फेरीत ५ विकेट्सने विजय मिळवला.

या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पाँइंट्स टेबलमध्ये ८ गुणांसह तिसऱ्या क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित केले आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचे मात्र स्पर्धेतील आव्हान संपले आहे.

रविवारच्या सामन्यात जर युपीने विजय मिळवला असता, तर मुंबईला (Mumbai Indians) प्लेऑफची संधी होती. मात्र दिल्लीने तिसरे स्थान निश्चित केले आहे.

<div class="paragraphs"><p>Delhi Capitals</p></div>
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचं नशीब यूपीच्या हाती! हरमनप्रीत कौरची खेळी व्यर्थ, गुजरात जायंट्सने Eliminator मध्ये मारली एन्ट्री
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com