IPL 2026 Qualification: दिल्लीचा पाचवा पराभव, पण अद्यापही Play off ची संधी; कसे आहे पुढचं समीकरण

Delhi Capitals Playoff Scenario: दिल्ली कॅपिटल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सोमवारी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. हा दिल्लीचा हंगामातील पाचवा पराभव होता. त्यामुळे आता त्यांच्यासमोरील प्लेऑफचे समीकरण कसे आहे, जाणून घ्या.
Delhi Capitals | IPL 2026

Delhi Capitals | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, Delhi Capitals Playoff Qualification: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सला सोमवारी (२७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीला बंगळुरूने ९ विकेट्सने पराभूत केले. दिल्ली कॅपिटल्सचा हा हंगामातील ५ वा पराभव आहे. तसेच सलग तिसरा पराभव आहे.

दिल्लीने आयपीएल २०२६ स्पर्धेत आत्तापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यातील ५ सामने पराभूत झाले आहेत, तर तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स सध्या पाँइंट्स टेबलमध्ये ७ व्या क्रमांकावर आहेत.

Delhi Capitals | IPL 2026
IPL 2026: राजस्थानची अग्निपरीक्षा २६५ धावा चेस करणाऱ्या वादळी पंजाबला रोखणार कसं? श्रेयस अय्यरचा मास्टरप्लॅन तयार, पाहा संभावित Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com