

Devdutt Padikkal Century | Sri Lanka vs India 1st Test
Sakal
Sri Lanka vs India 1st Test Cricket Marathi News: भारत विरुद्ध श्रीलंका संघात गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना शनिवारपासून (१५ ऑगस्ट) सुरू झाला आहे.
या सामन्याच्या पहिल्या दिवस देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) गाजवला आहे. त्याने शानदार शतक केले, ज्याला केएल राहुलची (KL Rahul) दमदार साथ मिळाली. त्यामुळे या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. पावासाचा अडथळा आलेल्या सामन्यात भारताने २ बाद २८८ धावा पहिल्या दिवशी केल्या. पडिक्कल शतक (Century) करत नाबाद राहिला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने श्रीलंका प्रथम गोलंदाजीसाठी उतरले. भारताकडून यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात चांगली केली होती. जैस्वाल थोडा आक्रमक खेळत होता.
मात्र ११ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुल आणि जैस्वाल यांच्यात एकेरी धावेसाठी धावताना मोठा गोंधळ झाला. त्यामुळे दोन्ही खेळाडू नॉन-स्ट्रायकर एन्डला धावले आणि याचा फायदा श्रीलंकेने घेतला. जैस्वाल ३२ धावांवर धावबाद झाला. त्याने केएल राहुलसोबत ४७ धावांची भागीदारी केली.