IPL 2024 : एका खेळाडूमुळे चेन्नईला बदलावा लागला प्लॅन! ऋतुराजला मिळणार नवा जोडीदार

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला.
Devon Conway Got Injured Ruturaj Gaikwad and Rachin Ravindra open for CSK IPL 2024 Marathi News
Devon Conway Got Injured Ruturaj Gaikwad and Rachin Ravindra open for CSK IPL 2024 Marathi News

Chennai Super Kings IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला. सोमवारी एक अपडेट देताना न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले की, स्टार सलामीवीर डेव्हन कॉनवे दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याला बरे होण्यासाठी किमान आठ आठवडे लागतील. अशा परिस्थितीत तो किमान आठ आठवडे क्रिकेटपासून लांब राहणार आहे.

Devon Conway Got Injured Ruturaj Gaikwad and Rachin Ravindra open for CSK IPL 2024 Marathi News
कसोटी सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर, बदलीची घोषणा! 'या' स्टारला मिळाली संधी

आयपीएल 2024चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. कॉनवेला दुखापतीतून सावरण्यासाठी 8 आठवडे लागतील. त्याच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज ऋतुराजला गायकवाडसाठी नवीन जोडीदाराच्या शोधात असेल. पण आता कॉनवेच्या अनुपस्थितीत रचिन रवींद्रसाठी दार उघडले आहे. गायकवाडसह तो सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून पदार्पण करू शकतो.

Devon Conway Got Injured Ruturaj Gaikwad and Rachin Ravindra open for CSK IPL 2024 Marathi News
WPL 2024 Points Table : गुजरातचा पराभवाचा चौकार तर दिल्लीची विजयी हॅट्ट्रिक! कोण आहे पॉइंट टेबल टॉपर?

2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या रचिन रवींद्रला डिसेंबर 2023 मध्ये मिनी लिलावादरम्यान चेन्नई सुपरने 1.8 कोटी रुपयांना करारबद्ध केले. या 24 वर्षीय युवा फलंदाजाने 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये 3 शतकांच्या मदतीने 578 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत कॉनवेच्या जागी चेन्नई त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी देऊ शकते.

मात्र, रचिनसाठी कॉनवेची जागा घेणे इतके सोपे नसेल. ऋतुराजसोबत कॉनवेने गेल्या दोन मोसमात चेन्नईसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 23 सामन्यात 48.63 च्या सरासरीने आणि 141.28 च्या स्ट्राईक रेटने 924 धावा केल्या आहेत. त्याने 9 अर्धशतके केली आहेत. तो 2023 मध्ये चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 16 सामन्यात 672 धावा केल्या. फायनलमध्ये त्याने 47 धावांची झटपट इनिंग खेळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com