IND A vs NZ A, 2nd Test: पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप, पण दुसऱ्या मॅचमध्ये थेट नाबाद ९९! ध्रुव जुरेलने पडिक्कलसह सावरला भारताचा डाव

India A vs New Zealand A 2nd Test, 1st Day Report: भारत अ संघाचा न्यूझीलंड अ संघाविरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेलने चांगला खेळ करत भारताचा डाव सावरला. जुरेल पहिल्या दिवस अखेर शतकाच्या उंबरठ्यावर आहे.
Dhruv Jurel | India A vs New Zealand A

Dhruv Jurel | India A vs New Zealand A

Sakal

Updated on: 

New Zealand A vs India A, 2nd Unofficial Test, 1st Day: भारतीय अ क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर दुसरा सामना शनिवारी (३१ ऑक्टोबर) सुरू झाला. दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि कर्णधार ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) गाजवला. जुरेल आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

पहिल्या सामन्यात १ आणि २ धावेवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कर्णधार जुरेलने दमदार पुनरागमन करत त्याचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठीही त्याने दावेदारी ठोकली आहे.

Dhruv Jurel | India A vs New Zealand A
IND A vs NZ A Live: न्यूझीलंडच्या फलंदाजांचा रडीचा डाव, अचानक मैदान सोडले! भारताला विजयासाठी एकच विकेट हवी होती, १७ षटकं शिल्लक होती... नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...